पाचोड (जि. औरंगाबाद) : शेती हंगाम बेभरवशाचा खेळ आहे. कधी होत्याचे नव्हते होईल. याचा नेम नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पुन्हा एकदा खरं ठरलं. गत महीन्यापासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. एक) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक रौद्ररुप धारण केले.प्रचंड विजेच्या कडकडाट व ढगाच्या गडगडाटात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने पाचोड (ता.पैठण) सर्वञ हाहाकार उडाला. सलग पाऊण तास जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांत पाणी तर ठिकाणी गावाकडे परतणाऱ्या नागरिकांचा अन् रस्त्याचा संपर्क तुटला.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक धो... धो पडलेल्या या पावसामुळे हातातोंडाशी आलेले अन् अगोदरच पूर्णतः पाण्यात बुडालेले बाजरी,कापूस, तूर, ऊस, सोयाबीन आदी पिकांना पावसाच्या दोन दिवसाच्या उघडिपनंतर पुन्हा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सर्वच पिके जमीनदोस्त होऊन या मुसळधार पाऊसामुळे खरीप हगामातील सर्वच पिके हातची जाण्याच्या मार्गावर आहेत. पाचोड महसूल मंडळात पावसाने थैमान घातल्याने केकत जळगाव, हर्षी, थेरगाव, लिंबगाव, दावरवाडी, नांदर, दादेगाव हजारे, मुरमा, कडेठाण, कोळी बोडखा, वडजी, रांजनगाव दांडगा, खादगाव आदी भागातील उभ्या पिकांना पावसाचा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे असंख्य शेतातील माती खरडून गेली,शिवाय शेतातील बांधही पावसाच्या पाण्याने फुटून गेल्याचे पाहावयास मिळत आहे.
#aurangabad #rainupdate #heavyrain #monsoonupdate #esakal #sakal